आनंदवन

आनंदवन - हेमलकसा - सोमनाथ - ताडोबा ...भेट.

Tour Info

श्रमर्षी कै. श्री. बाबा आमटे यांनी त्यांच्या अपार मेहनत आणि जिद्दीने जे काम केलं आहे, ते सर्वज्ञात आहेच. तसेच त्यांचे दोन्ही सुपुत्र श्री. विकास आमटे आणि श्री. प्रकाश आमटे या दोघांनीही बाबांचे कार्य तर पुढे नेलेच पण त्या दोघांनीही आपापल्या कामांनी या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या सर्वांच्या कामांची जवळून ओळख व्हावी, या उद्देशाने ‘आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ’ या प्रकल्पांची भेट आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच वाघांसाठी असलेली महाराष्ट्रातील 'ताडोबा ' भेट देखील आयोजित करण्यात आलेली आहे. सदरहू कार्यक्रमा ची तारीख आणि रूपरेषा खालील प्रमाणे आहे;

*** संपूर्ण कार्यक्रमाचे शुल्क नागपूर ते नागपूर रु. 13,500/- एवढे आहे. छुपा खर्च नाही. ***

विशेष सूचना -
1) प्रत्येकाने आपापले ओळख पत्र आणणे आवश्यक आहे.
2) संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान ग्रुप सोबत एक ग्रुप लीडर असेल.
3) आपली नोंदणी लवकरात लवकर करावयाची आहे. नोंदणीसाठी एकूण शुल्काच्या 75 % रक्कम अदा करावयाची आहे. उर्वरित रक्कम प्रवासाला निघण्याच्या 1 महिना आधी अदा करणे आवश्यक आहे. काही कारणांमुळे आपणांस सदर कार्यक्रमास येता आले नाही, तर नोंदणी रक्कम परत मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
4) प्रकल्प भेटी दरम्यान सहभागी सदस्य तेथील निर्मित वस्तूंची खरेदी करू शकतात.
5) कार्यक्रम दरम्यान फक्त शाकाहारी भोजनच मिळेल.
6) आपल्या पैकी कुणास देणगी द्यावयाची असेल, त्यांनी त्यांचा धनादेश ' महारोगी सेवा समिती - वरोरा' या नावे देऊ शकता. सदरहू देणगी हि ‘80 G’ अंतर्गत आयकर सवलतीस पात्र आहे.
7) संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान धूम्रपान, मद्यपान, तंबाखू वा इतर कुठल्याही व्यसनास पूर्णत: सक्त मनाई आहे.
8) परिस्थिती नुसार कार्यक्रमात फेर बदल करण्याचे अधिकार आयोजकांना आहे.
9) ट्रेन किंवा विमान प्रवासाच्या तिकीटासाठी मदत अवश्य केली जाईल.

Itinerary

Travel Day     01 ऑक्टोबर 2019 - मंगळवार    
    
Location मुंबई - नागपूर

मुंबई (सीएसटी) येथून दुरांतो एक्स्प्रेस ने सायंकाळी नागपूर साठी प्रयाण.
यासाठी सर्वांनी सीएसटी स्थानक येथे सायंकाळी 7.00 वाजे पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
ज्या कोणा व्यक्तीस विमानाने यावयाचे असल्यास, त्यांनी दि. 02 ऑक्टोबर 2019 शनिवार रोजी पहाटेच्या विमानाने नागपूर येथे पोहोचावे.

Day 1     02 ऑक्टोबर 2019 - बुधवार    
    
Location - ताडोबा

सकाळी नागपूर स्टेशन - विमानतळ येथे आगमन. चहा व नाश्ता आटोपल्यावर 'ताडोबा' कडे प्रस्थान.
सकाळी 11.00 वाजता ताडोबा येथे आगमन.
दुपारी 1.00 वाजता भोजन व नंतर आराम.
दुपारी 2.30 ते 6.00 पर्यंत 1 ली 'ताडोबा' सफर.
रात्री 9.00 वाजता भोजन व मुक्काम.

Day 2     03 ऑक्टोबर 2019 - गुरुवार    
    
Location 'ताडोबा' - आनंदवन

सकाळी पहाटे 5.30 ते 10.00 पर्यंत 2 री 'ताडोबा' सफर
चहा व नाश्ता आटोपल्यावर 'आनंदवन' कडे प्रस्थान.
सकाळी 11.00 वाजता आनंदवन येथे आगमन.
दुपारी 12.00 वाजता भोजन व नंतर आराम.
दुपारी 2.00 ते सूर्यास्ता पर्यंत आनंदवन सफर.
रात्री 8.00 वाजता भोजन व मुक्काम.

Day 3     04 ऑक्टोबर 2019 - शुक्रवार    
    
Location - हेमलकसा

सकाळी चहा व नाश्टा आटोपल्यावर 8.00 वाजल्या पासून आनंदवन येथील इतर प्रकल्पानां भेट.
दुपारी 12.00 वाजता भोजन व त्या नंतर लगेचच 'हेमलकसा' (श्री. प्रकाश आमटे यांचा प्रकल्प) यासाठी प्रयाण.
सायंकाळी 4.30 वाजता हेमलकसा येथे आगमन.
सायंकाळी 5.00 ते 6.30 या दरम्यान 60 एकर परिसरात पसरलेल्या प्रकल्पातील प्राणी संग्रहालय, आदिवासी आश्रम शाळा, हॉस्पिटल भेट व नदीवर फेरफटका असा कार्यक्रम असेल.
रात्री 8.00 वाजता भोजन व मुक्काम.

Day 4     5 ऑक्टोबर 2019 -     
    
Location - हेमलकसा - सोमनाथ

सकाळी चहा व नाश्टा आटोपल्यावर 7.00 वाजल्या पासून हेमलकसा येथील इतर प्रकल्पानां भेट.
दुपारी 12.00 वाजता भोजन व त्या नंतर लगेचच 'सोमनाथ' यासाठी प्रयाण.
सायंकाळी 4.30 वाजता सोमनाथ येथे आगमन.
सायंकाळी 5.00 ते 6.30 या दरम्यान प्रकल्पास भेट.
रात्री 8.00 वाजता भोजन व मुक्काम.

Day 5     06 ऑक्टोबर 2019 -     
    
Location - सोमनाथ - नागपूर

सकाळी चहा व नाश्टा आटोपल्यावर 7.00 वाजल्या पासून सोमनाथ येथील भातशेती, फळे उत्पादन, भाजीपाला, व उत्तर प्रकल्पानां भेट.
दुपारी 12.00 वाजता भोजन व त्या नंतर थोडा वेळ आराम करून 1.30 वाजता नागपूर साठी प्रयाण.
सायंकाळी नागपूर स्टेशन / विमानतळ येथे आगमन आणि विदर्भ एक्स्प्रेस ने किंवा दुरांतो एक्स्प्रेस ने सायंकाळी मुंबई साठी प्रयाण.
(विमानाने प्रवास करणारे त्याच दिवशी सायंकाळी मुंबईस येतील).

Inclusions

Price Includes
वरील शुल्का मध्ये नागपूर ते नागपूर सर्व खर्च समाविष्ट आहे.
यांत 4 दिवसाच्या कार्यक्रमासाठी 2 x 2 निम आराम बस प्रवास (नॉन एसी),
चहा व नाश्त, दुपारचे व रात्रीचे भोजन व एकत्रित निवासाची व्यवस्था आहे.
पुरुष व स्त्रियांची राहायची व्यवस्था वेग वेगळी असेल.
एका मोठ्या रूम मध्ये 4 लोकं राहतील. (व्यक्तिगत राहायची सोय कोणालाही उपलब्ध नाही.)
पिण्याच्या पाण्यासाठी पुरेश्या 'बिसलेरी' बॉटल्स आपल्या सॊबत असतील.
या भेटी दरम्यान आपणांस पुढील प्रमाणे स्थळं पाहता - अनुभवता येतील.
जसे - श्रमर्षी कै. श्री. बाबा आमटे व साधना ताई आमटे यांची समाधी, कुष्ठ रोग्यांचे हॉस्पिटल, वसाहत शाळा, अंध - मूक - बधिर मुलांची शाळा, भूकंप विरोधी घरे, विविध उद्योग, मानव निर्मित तलाव, भातशेती, फळे उत्पादन, भाजीपाला, प्राणी अनाथालय, टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्मिती, विविध कला कृतींच्या कार्यशाळा, वस्त्रोद्योग, बायोगॅस प्लांट या सारख्या अनेक गोष्टी.

Exclusions

वरील शुल्कात मुंबई - नागपूर - मुंबई ट्रेन प्रवास वा विमान प्रवास समाविष्ट नाही.
कार्य्रक्रमा दरम्यान चा कुठलाही वैयक्तिक खर्च समाविष्ट नाही.

* We will assist you for Air Bookings - if required.

Terms & Conditions

विशेष सूचना -
1) प्रत्येकाने आपापले ओळख पत्र आणणे आवश्यक आहे.
2) संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान ग्रुप सोबत एक ग्रुप लीडर असेल.
3) आपली नोंदणी लवकरात लवकर करावयाची आहे. नोंदणीसाठी एकूण शुल्काच्या 75 % रक्कम अदा करावयाची आहे. उर्वरित रक्कम प्रवासाला निघण्याच्या 1 महिना आधी अदा करणे आवश्यक आहे. काही कारणांमुळे आपणांस सदर कार्यक्रमास येता आले नाही, तर नोंदणी रक्कम परत मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
4) प्रकल्प भेटी दरम्यान सहभागी सदस्य तेथील निर्मित वस्तूंची खरेदी करू शकतात.
5) कार्यक्रम दरम्यान फक्त शाकाहारी भोजनच मिळेल.
6) आपल्या पैकी कुणास देणगी द्यावयाची असेल, त्यांनी त्यांचा धनादेश ' महारोगी सेवा समिती - वरोरा' या नावे देऊ शकता. सदरहू देणगी हि ‘80 G’ अंतर्गत आयकर सवलतीस पात्र आहे.
7) संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान धूम्रपान, मद्यपान, तंबाखू वा इतर कुठल्याही व्यसनास पूर्णत: सक्त मनाई आहे.
8) परिस्थिती नुसार कार्यक्रमात फेर बदल करण्याचे अधिकार आयोजकांना आहे.
9) ट्रेन किंवा विमान प्रवासाच्या तिकीटासाठी मदत अवश्य केली जाईल.

Fill in the details

CONTACT

Contact us and we'll get back to you.

Nature Zone Holidays

Mr. Shrikant Undalkar

Mumbai - India

+91 – 98691 76070 & +91 – 76663 60320

naturezoneholiday@gmail.com